न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- ज्युपिटर (एमएच१४एफएच ८४३२) वरुन जात असताना पाठीमागुन येणा-या बस (एमएच४६जे००२९) वरील चालकाने स्वतःच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, हयगयीने, निष्काळजीपणाने, वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन चालवले. फिर्यादीच्या भावाला धडक दिल्याने तो गाडीवरुन खाली पडला.
गाडीने फरफटत नेल्याने दोन्ही पायाला, कमरेला व इतर ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे त्यातच त्याचा मृत्यू झाला. गाडीचेही नुकसान झाले. आरोपी वाहनचालक त्याच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे. तसेच अपघाताची खबर न देता आरोपी पळून गेला, असे फिर्यादी म्हटले आहे.
हा अपघात (दि. २९) रोजी १०.४५ च्या सुमारास गणेश मंदीराच्या विरुध्द बाजूस थेरगांव येथे घडला. फिर्यादी शंकर लक्ष्मण सोनवणे यांनी आरोपी बस वरील चालकाच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ७३६ /२०२३ भा.दं.वि कलम ३०४ अ, २७९, ४२७, मो. वा. का कलम १८४, ११९/१७७, १३२ (१) (क) अन्वये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउनि शिंगारे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.















