न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- टेलिग्राम मोबाईल अॅप्लिकेशनवर वैयक्तिक टेक्स्ट मेसेजेस पाठवले. कमिशन देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये गुंतवणुक स्वरुपात स्विकारुन त्या मोबदल्यात कमिशन न देता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फसवणुकीची ही घटना (दि. २४ ते दि. २६) पर्यंत सलग ३ दिवसांत एकुण ५ वेळा फिर्यादीच्या राहत्या घरी घडली. फिर्यादी दत्तात्रय जनार्दन अनुसे यांनी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी ३४६/२०२३भा.दं.वि कलम ४२० आय.टी. अॅक्ट ६६ (डी) नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोनि गुन्हे वाघमोडे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.















