न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळविण्यासाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि. २) आमदार जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासोबत असलेल्या मतभेदांविषयी चर्चा केली.
आमदार जगताप यांनी मावळचा उमेदवार बदलण्यात यावा, अशी आपली भूमिका असल्याचे सांगितले. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारातच अंतिम तोडगा काढण्याचे बैठकीत निश्चित झाले. त्यामुळे आता मुख्यमंत्री यशस्वी शिष्टाई करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार हेही उपस्थित होते. या भेटीत देखील आमदार जगताप यांनी शिवसेनेने मावळचा उमेदवार बदलावा, अशी पुन्हा मागणी केली. मंत्री महाजन यांनी बारणे यांच्यासोबत असलेल्या मतभेदांची आमदार जगताप यांच्याकडून माहिती घेतली. तसेच या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारातच अंतिम तोडगा काढण्याचे बैठकीत निश्चित झाले. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस यशस्वी शिष्टाई करतात का? आणि भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी एकत्रित प्रचारात सहभागी होतील का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










