न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल) :- वारजे येथील संकल्प शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यकर्ता पुरस्कार भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते, विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांना प्रदान करण्यात आला आहे.
श्रमिक पत्रकार भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमास पोलीस सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, हभप धर्मराज हांडे महाराज, शास्त्रज्ञ प्रमोद बकरे, संकल्प शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विलास पवार आदी उपस्थित होते.
सौंदणकर यांनी विद्युत विभागातील मोठमोठे भ्रष्टाचाराचे घोटाळे बाहेर काढलेले आहे. या कार्याची दखलही घेण्यात आली आहे. ते शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक म्हणून काम करीत आहेत.










