न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- जुनी सांगवी, दापोडीत रस्त्याची दुरावस्था झाल्याने ‘प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे’ मनसेच्या वतीने पाणी साठलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आले.
सांगवीतील चंद्रमणी नगर, मधुबन सोसायटी, संगम नगर, ममता नगर, बुध्दघोष सोसायटी, PMPL मुख्य बस स्टॉप, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, शितोळे नगर तसेच दापोडी भागातही रस्त्याची दुरावस्था झाली.
रस्ते दुरूस्ती होत नसल्याने स्थापत्य विभागाच्या विरोधात आज सांगवीत झाडे लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे अलेक्सझांडर आप्पा मोझेस उप विभाग अध्यक्ष, मंगेश भालेकर उपविभाग अध्यक्ष, गणेश माने शाखा अध्यक्ष, मनोज महाजन, सागर भोकरे वॉर्ड अध्यक्ष, दिलीप ठोंबरे मनसे सैनिक आदी उपस्थित होते.
दुरूस्ती वेळेत न झाल्यास “ह” प्रभाग कार्यालय येथे लवकरच मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा उपशहर अध्यक्ष राजू सावळे व अलेक्स आप्पा यांनी दिला आहे.











