न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे असे थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या निगडीतील स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
*तसेच ज्यांच्या लेखणीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रेरणा मिळाली, असे थोर साहित्यिक, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त निगडी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड जिल्हा शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप, सदाशिव खाडे, अमित गोरखे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, राजेंद्र बाबर, विलास मडेगिरी, मनोज तोरडमल, नेताजी शिंदे, मदन गोयल, देवदत्त लांडे, कोमल शिंदे, कमलेश बहरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.











