न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- वॉशिंग सेंटर येथे काम करत असताना दोन अनोळखी इसम टू व्हिलर गाडी धुण्यासाठी घेवुन आले. गाडी धुवून झाल्यानंतर त्यांना फिर्यादीने पैसे मागीतले असता त्यांना त्याचा राग आला. त्यामधील काळ्या रंगाचा जॅकेट घातलेला इसम फिर्यादीला म्हणाला ‘तुझ्या मालकाला कॉल लाव, तुझ्या मालकाचा मी दाजी आहे’, असे बोलून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन मारहान करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस जागा मालकाला बोलावले असता, त्यांनी काळ्या जॅकेटवाले माझे दाजी असुन त्याच्यासोबत असलेला त्यांचा भाऊ आहे. ते माझे नातेवाईक आहेत, असे म्हणाले.
पुन्हा काही वेळाने आरोपी दोघांनी वॉशिंग सेंटरसमोर येऊन वाशिंग सेंटरची तोडफोड केली. बॅनर फाडुन २०,००० रुपयांचे नुकसान केले. फिर्यादीच्या मित्राच्या गळ्यातील २,५०,००० रुपये किमतीची ६ तोळे वजनाची किंमतीची सोन्याची चैन आरोपीने हिसका मारुन जबरदस्तीने काढुन घेत आजुबाजुच्या दुकानदारांना मारहाण केली. तसेच महिलेसह तिघांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. जिवे मारण्याची धमकी देवुन फिर्यादीला व एकाला ‘उदया तुझा मर्डर करतो, तुम्ही पोलीसांत माझ्या विरुद्ध तक्रार दिली तर मी सर्वाना जिवेनिशी मारुन टाकिन’ अशी धमकी दिली.
हा प्रकार (दि. ३०) रोजी रात्री ८.०० ते र ११.०० च्या दरम्यान व्हीआयपी वॉशिंग सेंटर, प्रतिभा हिरो शोरुम समोर, भुमकर चौक रोड, वाकड येथे घडला. फिर्यादी सुमित दत्तात्रय शिंदे यांनी राहुल विठ्ठल जौंजाळ, सिध्दार्थ विठ्ठल जौंजाळ, महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ७४३ / २०२३ भादवि कलम ३९२, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनि गिरनार करीत आहेत.











