न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका रावेत येथील बंधा-यातून पाणी उचलते. ते पाणी प्राधिकरणातील जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द करून शहरातील विविध भागातील टाक्यांमध्ये वितरित केले जाते.
सद्यस्थितीत पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पवना नदीत सद्यस्थितीत गढूळ पाणी येत आहे. सदरचे पाणी जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द करण्यात येत असून पिण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.











