न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- साईराज पब्लीसीटीचा होर्डींग, जाहीरात फलक झाडांमुळे लोकांना दिसत नसल्याने, तो रोडने जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांच्या सहज नजरेस पडावा यासाठी होर्डींग धारकांमार्फत सोसायटीच्या मालकीचे पिंपळाचे झाड तसेच मनपाच्या सार्वजनिक फुटपाथवरील ट्री गार्डमध्ये लावलेली मनपा मालकीची एकुण ४ झाडे अज्ञात व्यक्तींनी येवुन एकुण ५ वृक्षांची तोड केली आहे.
हा प्रकार (दि. २२) रोजी ११.३० च्या सुमारास रॉयल पाम सोसायटी, शिवरोड, बो-हाडेवाडी, मोशी येथील फुटपाथवर व रॉयल पाम सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर घडला आहे.
या प्रकरणी महापालिकेच्या उद्यान सहायकाने साईराज होर्डींगचे मालक व अज्ञात इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ३२९/२०२३ महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमन) अधिनियम १९६४ कलम ३ (१), ४, महाराष्ट्र (नागरीक्षेत्र), झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम २१ (१) प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोहवा फावडे पुढील तपास करीत आहेत.











