- वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :-पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरीमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबाबत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना पेट्रोलींग, सक्त नाकाबंदी आणि वाहन चोरी करणाऱ्या आरोपींची माहीती काढुन त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिली होते.
दरम्यान चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी चौघेजन थेरगाव परिसरात येणार आहेत, अशी माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी थेरगावमध्ये सापळा रचला. काही वेळात चार इसम दोन दुचाकीवरुन तेथे आले. पोलीसांची चाहुल लागताच आरोपी हे पळुन जाण्याचा प्रयत्न करित होते. त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.
कमलेश भागवत परदेशी (वय २२ वर्षे रा. चिंतामणी चौक, बिजलीनगर हरीओम कॉलनी नं. ०२, चिंचवड, मुळ रा. मुपो. लोंढे ता. चाळीसगाव जि. जळगाव), शुभम राजेंद्र निकम (वय २० वर्षे रा. वाल्हेरकरवाडी, पेट्रोल पंपाचे जवळ, गुरुद्वारारोड चिंचवड, मुळ रा. मुपो. लोंढे ता. चाळीसगाव जि.जळगाव), पुष्पक दिलीप पाटील (वय २३ वर्षे रा. आनंदवन सोसायटी, थेरगाव, मुळ रा. मुपो. लोंढे ता. चाळीसगाव जि. जळगाव), प्रज्वल लालजी भोसले (वय २४ वर्षे रा. वाल्हेरकरवाडी, पेट्रोल पंपाचे जवळ, गुरुद्वारारोड चिंचवड, मुळ रा. मुपो. लोंढे ता.चाळीसगाव जि.जळगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
होंडा शाईन व होंडा सिबी शाईन या दुचाकीबाबत त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदरच्या दुचाकी वाकड व चिखली परीसरातुन चोरल्याचे सांगीतले. त्यांनी पिंपरी चिंचवड परीसरातील दुचाकी चोरीचे एकुण १० गुन्हयांची कबुली देवुन किं.रु. ५,००,००० रुपये किंमतीच्या १० मोटार सायकली त्यांचेकडुन जप्त करणेत आल्या असून अधिक तपास करीत आहोत. आरोपींची दि.०२/०७/२०२३ पोलीस कोठडी प्राप्त आहे. वाकड तपास पथकाने चालु वर्षात आजपर्यंत दुचाकी चोरीचे ९० गुन्हे उघड करुन एकुण ४५,००,००० रु किंमतीच्या ९० दुचाकी जप्त करुन आरोपी अटक केले आहेत.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे सह. पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त,परि- २ पिंपरी चिंचवड, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफो. बाबाजान इनामदार, सपोफौ.राजेंद्र काळे, पोहवा. वंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा.प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना.राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि.सौदागर लामतुरे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.
वाहन चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ होत असुन आपण आपले वाहन सुरक्षीत ठिकाणी पार्क करावेत. पार्कींग व्यवस्था नसल्यास सदर वाहनास चैनच्या साहाय्याने अथवा दुसरे लॉक लावावे जेणेकरुन आपले वाहन सुरक्षीत राहील. तसेच जिपीएस सिस्टीम बसवुन घ्यावेत. तसेच आपली वाहने कंपनीचे बाहेर, सोसायटीच्या बाहेर, मॉलच्या व दुकानाच्या बाहेर रोडवर पार्क करुन ठेवु नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.











