न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :- महावीर चौकातून चिंचवडगावाकडे जाणारा जुना रेल्वे पुल हा कमकुवत झाला असुन पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याबाबत पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने दि. १ ते दि. १० ऑगस्ट पर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत.
महावीर चौकाकडुन चिंचवडगांवाकडे जाणारी जड व अवजड वाहनांना पुलावरुन लोकमान्य हॉस्पीटल चौकात जाण्यास बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग महावीर चौक- खंडोबा माळ- भक्ती शक्ती येथुन बिजलीनगर मार्गे रिव्हर व्हयु -चौक मार्गे ईच्छित स्थळी जातील.
महावीर चौकाकडुन चिंचवडगांवाकडे जाणारी दुचाकी/हलक्या वाहनांना पुलावरुन लोकमान्य हॉस्पीटल चौकात जाण्यास बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग महावीर चौकाकडुन खंडोबा माळ चौकातून डावीकडे वळून चिंचवडगांव मार्गे इच्छित स्थळी जातील. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाहतुक बदलाबाबत वॉर्डन व वाहतुक कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर, वाहतुक शाखा यांच्या वतीने करण्यात आला आहे.











