- शहरात वाहनं चोरून विकायचा गावातल्या शेतकऱ्यांना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :- दिवसा वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोराला हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. रवि परमेश्वर धांडगे (वय २३ वर्षे, रा. पाथरगव्हाण ता. पाथरी जि.परभणी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन काही विशीष्ट ठिकाणाहून वारंवार दिवसा मोटार सायकल चोरी होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दोन टिम तयार केल्या. हिंजवडी पोलीस स्टेशन व वाकड पोलीस स्टेशन हददीतील चोरीचे ठिकाणे निश्चीत करून त्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना इसम हा वारंवार चोरी करताना दिसत होता.
(दि. १९) रोजी पर्सिस्टंट कंपनी जवळुन दिवसा एक एच.एफ डिलक्स मोटार सायकल चोरी झाल्याने हिंजवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.८०९/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता. गुन्हयाच्या ठिकाणी असणाऱ्या सी. सी.टि.व्हि. फुटेजच्या आधारे हिंजवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी हिंजवडी पुणे ते सुपा अहमदनगर पर्यंत ३५० सी. सी.टि.व्ही. फुटेजची पाहणी केली असता तपास पथकातील पोलीस शिपाई २२८४ पालवे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सी.सी.टि.व्हि फुटेज मधील इसम हा पाथरगव्हाण ता.पाथरी जिल्हा परभणी येथील असुन तो अधुन मधुन हिंजवडी येथील पांडवनगर परिसरात राहण्यास येऊन काही दिवस राहून मोटार सायकल चोरून गावाकडे निघून जात असतो असे समजले.
त्याप्रमाणे वरीष्ठांचे आदेशाने हिंजवडी तपास पथकाने पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील पाथरगव्हाण ता. पाथरी जि. परभणी येथे जावुन संशयीत इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडे दाखल गुन्हयातील चोरी गेलेल्या मोटार सायकलबाबत तपास केला असता त्याने सदरची मोटार सायकल चोरी करून ती विकास उध्दव धांडगे (रा. पाथरगव्हाण ता. पाथरी जि.परभणी) याला विक्री केली असल्याचे सांगीतले. त्यानंतर पाथरगव्हाण गावात शेतात सापळा रचून विकास धांडगे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर मोटर सायकल विकत घेतली असल्याचे सांगीतले. त्यानंतर विकास धांडगे याच्याकडे चौकशी करीत असताना गोपनीय माहीती मिळाली की आरोपी रवि परमेश्वर धांडगे याने ब-याच मोटार सायकल चोरी केल्या असून चोरी केलेल्या वाहनाची विकास उध्दव धांडगे हा शेतकरी लोकांना विश्वासात घेऊन गाडीचे कागदपत्रे दोन दिवसात आणून देतो असे खोटे सांगून विक्री केल्या आहेत. त्याप्रमाणे पोलीस पथकाने रवि परमेश्वर धांडगे याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने एकूण १५ दुचाकी वाहने शेतकरी लोकांना दिल्या असल्याचे सांगीतले. त्यानंतर त्या सर्व मोटार सायकल जप्त केल्या आहेत. त्यानंतर आरोपी रवि परमेश्वर धांडगे (वय २३ वर्षे, रा. पाथरगव्हाण ता. पाथरी जि.परभणी) याला अटक केली असून त्याला न्यायालयाने (दि. ४) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अटक मुदतीत आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने चोरी केलेल्या ३ मोटार सायकली हिंजवडी येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी विक्रीसाठी ठेवल्या होत्या, त्या जप्त केल्या आहेत.
आरोपीने खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे….
१) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ८०९/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.. २) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ७६८/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
३) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १७१ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
४) वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. २८६ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे ५) वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ६३५ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
६) सहकारनगर पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं.४८ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
७) विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. ३१४ / २०२९ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
८) सेलु पोलीस ठाणे परभणी गु.र.नं. १०/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
९) मानवत पोलीस ठाणे परभणी गु.र.नं. ६२/ २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
१०) नानलपेठ पोलीस ठाणे परभणी गु.र.नं. ४५४ / २०१७ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
(११) माजलगाव पोलीस ठाणे बीड गु.र.नं.४०/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे..
चोरीच्या दुचाकी बाबत वरीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१२) युनिकॉन मोटार सायकल एम.एच.१२ एन. एल. २८३८ १३) पेंशन निळया रंगाची मोटार सायकल तिचा चॉसीनंबर ०४डी ०९सी३८९०९
१४) पॅशन लाल रंगाची मोटार सायकल तिचा चॉसी नंबर एम.बी.एल.एच.ए.१० ई.एल.८९ एम. ०४०१०
(१५) पॅशन लाल नवीन मॉडेल एम.एच.२६ यु ३१७५ १६) ड्रिम युगा मोटार साकयल लाल रंगाची एम.एच.३८ एन.००१७
१७) पॅशन प्रो मोटार सायकल एम.एच.२२ ए.जी. १५८९
१८) एक पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा मोटार साकयल नंबर नसलेली. अ.क्र.१२ ते १८ मधील मोटार सायकल बाबत कोठे गुन्हे दाखल आहेत याबाबत माहीती काढण्याचे काम चालू आहे.
आरोपीने वरीलप्रमाणे गुन्हे केलेल्याचे व त्याचेकडे एकुण ५.४०,००० रुपये किंमतीच्या १८ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच दाखल गुन्हयाचा अधिक तपास चालू असून आरोपीकडुन आणखी गुन्हे केल्याचे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगीरी विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, डॉ. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे, सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), हिंजवडी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील सागर काटे, राम गोमारे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार बंडु मारणे, बापु धुमाळ, बाळकृष्ण शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, रितेश कोळी, अरुण नरळे, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, नरेश बलसाने, अमर राणे कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, दत्तात्रय शिंदे, सागर पंडीत यांनी केली.















