न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :- लाल रंगाचा पॅगो कंपनीचा ॲपे एक्स्ट्रा एल. डी. हा तिनचाकी माल वाहतुक टेम्पो (एमएच१४इएम९४३६) हा सार्वजनिक रोडच्या कडेला लॉक आणि पार्क केला होता. अज्ञात चोरटयाने तो चोरून नेला आहे.
चोरीची ही घटना (दि.३१/०७/२०२३) रोजी ००.३० वा. ते दि. ०१/०८/२०२३ रोजी ०८.४५ च्या) दरम्यान नवी सांगवी, येथील एम के चौक एचडीएफसी बँके समोरील सार्वजनिक रोडच्या कडेला घडला आहे.
फिर्यादी अरुण भिमराव जाधव (वय ४२ वर्षे धंदा – भाजी विक्री) यांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी ३७२ / २०२३ भा.दं.वि कलम ३७९ नुसार आरोपीवर गुहा दाखल केला आहे. मपोहवा ९८१ खेडकर पुढील तपास करीत आहेत.















