न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२३) :- केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी ते पुण्यात येणार आहेत.
उद्या (रविवारी) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहेत. बहुराज्यीय सहकारी संस्थानासाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे.
चिंचवडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे प्रेक्षागृहाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.














