न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२३) :- भोसरी-राजगुरुनगर मार्गावरील सदगुरुनगर येथून चाकण एमआयडीसी भागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर कामानिमित्त रोज प्रवास करत असतात. विद्यार्थी व महिला, मोठ्या प्रमाणावर शाळा, कॉलेजला व भोसरी मंडईत जाण्यासाठी रोज सकाळी-संध्याकाळी बस स्टॉपवर पावसात भिजतं उभे राहत असतात.
बसस्टँडचे छप्पर नसल्याने नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी प्रवाशी बांधवांना बसण्यासाठी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांना रस्त्यावर उभे राहून बस येण्याची वाट पहावी लागत आहे. तर, दुसरीकडे पुणे-नाशिक रस्ताला सर्विस रोड नसल्याने विरुध्द दिशेने वाहन चालक येतात. लहान मोठे अपघात होतात. वाहतूक कोंडी होतं आहे. त्यामुळे विनाकारण नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पीएमपीएमएलच्या सदगुरुनगर आगार व्यवस्थापक, स्थानिक लोकप्रतिनिधी, पीएमपीएमएल अधिकारी, महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष घालून नवीन बसस्टँड करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयदीप करपे यांनी केली आहे.


















