- ‘विविध संस्कृती, विविध परंपरा; मात्र बाप्पा एक’ या संदेशातून एकतेचा जागर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 30 सप्टेंबर 2026) :- जल वायु विहार, सेक्टर-६ येथे JVV Festivals Committeeच्या वतीने गणेशोत्सव भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल, सचिव कैलासजी जाधव व खजिनदार राकेशजी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
“विविध संस्कृती, विविध परंपरा; मात्र बाप्पा एक” या संदेशातून एकतेचा जागर करण्यात आला. मराठी भजन, JVV टीमचे भजन, महिलांसाठी खेळ, मुलांचे विविध उपक्रम, मॅजिक शो आदी कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
JVV नारी शक्तीच्या आवाहनानुसार विसर्जनावेळी गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला. उत्सवातील विशेष योगदानाबद्दल प्रज्ञेशभाई, रमणभाई आणि भाविक यांचा सन्मान करण्यात आला.
अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विविध समाज, भाषा व संस्कृतीतील नागरिकांना एकत्र आणणे हे उत्सवाचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात उत्सवाची सांगता झाली.

















