न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ सप्टेंबर २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा अध्यक्षपदी देवेंद्र तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी ही नियुक्ती केली.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व पिंपरी-चिंचवडचे निरीक्षक सुनील माने यांनी ही माहिती दिली. मुंबईतील पक्षाच्या मुख्यालयात प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या हस्ते तायडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
देवेंद्र तायडे यांच्या संघटनात्मक अनुभवाचा पक्षाला फायदा होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासह नागरिकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास सुनील माने यांनी व्यक्त केला.

















