- रिक्षा चालकांचा प्रमाणिकपणा आणि पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे दागिने मुळ मालकाला सुपूर्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२३) :- रावेत येथील मुकाई चौकात रिक्षा चालक गणेश फुरडे व सुरज तांबे यांना रस्त्यात पडलेली पांढऱ्या रंगाची बॅग आढळली. त्यामध्ये सोन्या चांदीचे ६-७ तोळे दागिने होते.
या दोघा रिक्षा चालकांनी देहूरोड पोलीस स्टेशनकडील डीबी स्टाफ निलेश जाधव यांच्याशी संपर्क केला. ती बॅग देहूरोड पोलीस स्टेशनच्या डीबी स्टाफकडे आणून दिली. पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी या बॅगमध्ये असलेल्या चिठ्ठीवरुन बॅगच्या महिला मालक यांचा मोबाईल क्रमांक तांत्रिक दृष्ट्या प्राप्त करून त्यांच्याशी संपर्क साधला.
बॅगमध्ये असलेल्या सोन्या व चांदीच्या दागिन्याबाबत खात्री करून ती बॅग महिलेच्या ताब्यात दिली. या दोन्ही रिक्षा चालकांचा देहुरोड पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे, अशी माहिती देहुरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली.