न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२३) :- कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे, पिंपरी उपबाजार विभाग प्रमुखपदी रोहिदास आनंदराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकताच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.
शिंदे यांनी यापूर्वी पिंपरी, चिंचवड, मोशी, खडकी या ठिकाणी काम केले असून ते मार्केटयार्ड येथे भाजीपाला विभाग बाजार निरीक्षक म्हणून काम पहिले आहे.
पिंपरी फुलबाजार, भाजी मंडई येथे जास्तीत जास्त सुविधा देण्यावर माझा भर असणार असून शेतकर्यांना आणि व्यापार्यांना भेडसावणार्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून बाजारामध्ये एकसुत्रता रहाण्यासाठी अधिकाधिक भर देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.















