न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२३) :- अर्ध्या तासापुर्वी झालेल्या भांडणाचा राग दोघा आरोपींनी मनात धरला. फिर्यादी व फिर्यादीचा मित्र यांना शिवीगाळ करुन त्यांना हाताने, लाथाबुक्याने मारहाण केली. आरोपीने त्याच्या हातातील लोंखडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात व फिर्यादीच्या मित्राच्या उजव्या हातावर मारुन फिर्यादीसह मित्राला जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ५) रोजी १०.३० च्या सुमारास रामकृष्ण मोरे कॉलेज, आकुर्डीच्या गेटजवळील झेरॉक्स सेंटर जवळ, आकुर्डी येथे घडला. फिर्यादी प्रणव गैवरान्ना अर्जुन याने आरोपी राज अवधुत शर्मा उर्फ सोन्या, गोटया शर्मा यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी ४९९/२०२३ भा. द. वि कलम ३२४, ३२३, ५०४,३४ आर्म अॅक्ट ४ (२५) महाराष्ट्र पो.अधि. ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे. सपोफो लांडे पुढील तपास करीत आहेत.















