न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२३) :- जेवण करण्यासाठी फिर्यादीसह आणखी एकजण दुचाकीवरून जात होते. पुणे नाशिक हायवे रोड, भोसरी येथे ते आले असता त्यांच्या पाठीमागुन आलेल्या ट्रकवरील अज्ञात चालकाने ट्रक हा भरधाव वेगात, निष्काळजीपणे व हयगयीने चालवून फिर्यादीच्या दुचाकीच्या उजव्या बाजुच्या हॅडेलला जोरात धडक दिली. त्यामुळे फिर्यादी व एकजण गाडीसह खाली पडले.
फिर्यादीच्या उजव्या हाताला दुखापत झाली. तसेच गाडीवरील एकाला डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातात गाडीवरील शुभम गणेश उदे (वय २१ वर्षे, रा. मोहननगर, भोसरी) हा मयत झाला आहे. आरोपी ट्रक चालकाने अपघाताची माहिती पोलीसांना न कळविता तसेच जखमी दोघांना दवाखान्यात न नेता तो पळून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा अपघात (दि. ५) रोजी ११.३० च्या सुमारास टाटा शोरूम जवळ, पुणे बाजुला, पुणे नाशिक हायवे रोड, भोसरी येथे घडला. फिर्यादी ऋषिकेश प्रभाकर हुंबे यांनी आरोपी ट्रक वरील अज्ञात चालक आरोपी याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ६४४ / २०२३ भा.दं.वि कलम २७९,३०४ मो. वा. अधि कलम ११९ / १७७,१३४ (ब) नुसार आरोपी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनि भवारी करीत आहेत.