न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२३) :- अल्टो कारने फिर्यादी एकाला त्यांच्या घरी सोडविण्याकरीता जात होत्या. दरम्यान कारमधील इसम कारमधुन उतरुन पान टपरीवर पान आणण्याकरीता गेले. परत कारजवळ आले असता कारच्या जवळ उभ्या असलेल्या आरोपीने दारुच्या नशेत फिर्यादी महिलेला अश्लील भाषेत बोलुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले व शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी व इसमाला हाताने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ५) रोजी रात्री १०.१५ वा. पीएमपीएलच्या बसस्टॉप जवळ, अजमेरा चौकातील पानटपरी जवळ, अजमेरा, पिंपरी येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी सिकदंर अब्दुल अहमद शहा याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ८२९/२०२३ भा.दं.वि कलम ३५४, ३५४ (अ), ३२३, ५०४ अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि कैलासे पुढील तपास करीत आहेत.