न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२३) :- जुन्या व्यवहाराचे पैसे फिर्यादीच्या मित्राकडून आरोपीला फोन पे द्वारे नजरचुकीने जास्त गेले होते. ते पैसे परत मागण्यासाठी फिर्यादीसह तिघेजन आरोपीकडे गेले. सह आरोपीने शिवीगाळ करून पैसे परत न देण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या पाठीवार चाकुने वार केले. तसेच मुख्य आरोपीने त्याच्या हातातील चॉपर फिर्यादीच्या छातीवर तसेच पोटात घुसवुन त्यांना गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी सोबतच्या दोघांवर चॉपरने वार केले. सह आरोपी व त्याच्या भावाने छातीवर व पोटावर चाकुने वार केले. तसेच अनोळखी इसम आरोपीने लाकडी दांडयाने सर्वांना मारहाण केली. आरोपीची पत्नी आरोपी हीने त्यांना शिवीगाळ करुन फिर्यादी व त्यांच्या साथिदारांना दगड फेकुन मारले. चौघांनी हाताने मारहाण करुन फिर्यादी व त्यांच्या साथिदारांना गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ६) रोजी रात्री ८.०० वाजता एचपी पेट्रोल पंपासमोर, मोकळे मैदान, काळे कॉलनी, आळंदी देवाची येथे घडली. फिर्यादी वसीम हुसेन शेख यांनी आरोपी नवाज सय्यद, राहुल सुरेश चोरडीया, महिला आरोपी, एक अनोळखी इसम (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी ३५८ / २०२३ भादवी कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह मपोका कलम ३७ (१) (अ) १३५. आर्म अॅक्ट कलम ४ (२५) नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. पोउपनि भदाणे पुढील तपास करीत आहेत.