न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२३) :- मामुर्डीतील जय गणेश चैरीटेबल ट्रस्टचे गणेश मंदीर (दि. ६ ते ७) दरम्यान फिर्यादीच्या वडीलांनी लॉक लावून बंद केले होते. कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाचे तरी साह्याने या मंदीराच्या लोखंडी ग्रीलला तसेच गाभा-याला लावलेले कुलूप तोडुन मंदीरामध्ये प्रवेश केला.
गाभा-यामध्ये असलेली दानपेटी उचकटुन त्यामध्ये असलेली १०,००० रु. रोख रक्कम चोरी करून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी अमोल दत्तात्रय राऊत यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलिसांनी ४४६/२०२३ भा.द.वी. कलम ३८०, ४५७ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि दिगंबर पुढील तपास करीत आहेत.














