- काळेवाडीतील एन.आर. एस. रुग्णालयातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२३) :- काळेवाडीतील एन.आर. एस. हॉस्पीटलमध्ये काम करणाऱ्या आरोपी मावशीने (दि. ३०/०६/२०२३) रोजी सायं. ४.१५ वाजता सुमारास महिला पेशंटला एक्स-रे काढण्यासाठी एक्स-रे रुममध्ये नेल्यानंतर त्यांच्या गळ्यातील २४ ग्रॅम वजनाची अंदाजे किंमत १,००,००० रूपये किमतीची वंश परंपरेने त्यांच्याकडे आलेली सोन्याची चैन लबाडीच्या इराद्याने चोरली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी शिवकुमार उमाकांत चाकोते यांनी महिला आरोपीच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. वाकड पोलिसांनी ७६७/२०२३ भा.द.वि. कलम ३८१ प्रमाणे आरोपी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गोडे पुढील तपास करीत आहेत.














