न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ३ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी (गवई गट) (कवाडे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांचा सध्या प्रचार दौरा सुरु आहे.
पार्थ यांनी चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील नक्षत्रम सोसायटी येथे भेट दिली. यावेळी सोसायटीतील पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष यशवंत शिंदे व त्यांच्या कुटुंबियांनी पार्थचे स्वागत केले. यावेळी सोसायटीतील व परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते.










