प्राथमिक माहितीनुसार, धोत्रे यांचे काळेवाडीतील पाचपीर चौकात ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचे दुकान आहे. रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी येत असताना त्यांच्यावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळीबार केला. या हल्ल्यात धोत्रे गंभीर जखमी झाले. नंतर त्यांना तात्काळ थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
धोत्रे यांच्याकडे दररोज दुकानाची सुमारे दोन ते तीन लाखांची रोकड असायची. त्यामुळे चोरट्यांनी लुटण्याच्या उद्देशाने उद्देशाने हा हल्ला केला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

















