न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड शहरात सध्या आगीचे लोण काही केल्या कमी होत नाही. बुधवार (दि. ३) रोजी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील गर्ल्स हॉस्टेलला मध्यरात्री १२ वाजता अचानक आग लागली.
यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हॉस्टेलमधील फर्निचर व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. घटनास्थळी वल्लभनगर अग्निशमन केंद्रातून दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आग आटोक्यात आणली.
आग लागल्याचे समजताच विद्यार्थिनींनी धावत खाली उतरून स्वतःची सुटका करून घेतली. मात्र तिसऱ्या मजल्यावर तीन विद्यार्थिनी आणि पाचव्या मजल्यावर एक विद्यार्थिनी प्रचंड धूर झाल्यामुळे अडकून पडल्या होत्या. आग्निशामक दलाने मोठ्या शिताफीने त्यांची सुटका केली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे समजते.










