न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४) :- मागील २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना पंतप्रधान करा, असे आवाहन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा आहे. राज ठाकरे यांनी मोदी-अमित शाह यांच्याविरुद्ध दंड थोपटले असल्याने त्यांच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान राज ठाकरे यांच्या मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. आधीच राज ठाकरे यांनी भाजपला विरोध करत मोदींना रोखण्यासाठी दंड थोपटले आहे. राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून व्यंगचित्रातून मोदी आणि शाह यांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे शनिवारी राज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात राज्यात ८ ते ९ प्रचारसभा घेणार आहेत. त्यामध्ये शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ निवडणूक लढवित असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांची सभा होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या वृत्ताला मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे.










