- पत्नीला मेव्हण्याची देखील साथ; पतीची पोलिसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२३) :- प्रॉपटींच्या हिस्स्याच्या मागणीकरीता फिर्यादीला त्यांची पत्नी व मेव्हण्याने मारहाण करुन केली. आरोपी पत्नीने शिवीगाळ व हाताने मारहाण करुन किचनमधील सुरी घेवुन फिर्यादीच्या अंगावर धावुन गेली. तसेच मोठमोठयाने आरडा ओरडा करुन शिवीगाळ करुन गॅस सिलेंडरकडे जावुन, पाईप काढण्याचा प्रयत्न करुन ‘तुम्हा सर्वाना जाळून मारुन टाकते’ अशी धमकी दिली.
तसेच, सह आरोपी मेव्हणा याने शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपरावर जोरात मारुन गंभीर जखमी करुन डाव्या हाताच्या कोपराचे हाड फ्रॅक्चर केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. ९) रोजी ८.४५ च्या सुमारास व (दि. १८) रोजी सकाळी ७.०० च्या सुमारास मोशीत घडला.
फिर्यादी राहुल तुकाराम सस्ते यांनी महिला आरोपी, मेहुणा शैलेश दत्तात्रय साकोरे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ३७० / २०२३ भा.द.वि.क ३२६,३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि आंगज पुढील तपास करीत आहेत.















