न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२३) :- नेपाळी ५२ वर्षीय इसम हा पायी नाशिक-पुणे महामार्ग पार करीत होता. त्यावेळी टाटा टेम्पोवरील आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून फिर्यादीचा मामा रामकृष्ण जैमानकामी यांना धडक दिली.
अपघातामध्ये फिर्यादी यांच्या मामाच्या छातीला व डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी होवुन त्यांचा मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक त्यांच्या मरणास कारणीभूत झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. २०) रोजी सायंकाळी ५.०० च्या सुमारास कुरुळीतील माय कार शोरूम समोर महामार्गावर घडली.
फिर्यादी सुनील चंद्रबहादुर काम याने आरोपी टाटा ११०९ टेम्पो क्र.एम.एच.१४ जे. एल. ९३९२ वरील चालक अनिल गंगाराम वाघ (वय ४३ वर्ष रा. बर्गेवस्ती, चाकण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे पोलिसांनी ५०४/२०२३ भा.द.वी. कलम २७९, ३३८, ३०४ (अ) मो.वा.का. १८४ प्रमाणे आरोपी वाहनचालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोहवा ४८६ जायभाये तपास करीत आहेत.

















