न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२३) :- नोकरीसाठी बाहेर पडताच आरोपी दोघींनी फिर्यादीच्या घरातील ३,८०,००० रुपये किंमतीचे १५ तोळे सोन्याचे दागीने व ४५,००० रुपये किंमतीचा घरातील सोपा, फ्रिज, फॅन, टीव्ही, घरातील भांडे असे साहीत्य चोरुन नेले आहे.
हा प्रकार (दि. ११ /१०/२०२२) रोजी एबीसी एम्लॉईज को ऑप हाऊसिंग सोसा. पवनानगर, चिंचवड येथील फिर्यादीच्या घरी घडला.
फिर्यादी भास्कर कारभारी गायकवाड यांनी आरोपी दोन महिलांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात ४०५ / २०२३भादवि कलम ३८०, ४०६, ४२०,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि करकटे पुढील तपास करीत आहेत.















