न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. ४ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी (गवई गट) (कवाडे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांचा आज गुरुवार (दि. ४) रोजी मावळातील कळंबोली येथे प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता.
यादरम्यान त्यांनी कळंबोली येथील माजी सरपंच बंटी पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या परिवाराच्या वतीने पार्थ यांचे स्वागत करण्यात आले. तसेच कळंबोली येथील हनुमान मंदिरात नागरिकांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थिती पार्थ यांनी उपस्थिती दर्शविली. कळंबोली येथील FCI (Food Corporation Of India) च्या कामगारांसोबत पार्थ पवार यांनी संवाद साधला.
तसेच Steel Authority of India येथील माथाडी कामगार संघटनेचे नेते बाळ मराठे, संपतराव गोडसे यांच्या उपस्थितीत कामगारांची बैठक संपन्न झाली. पुढे त्यांनी कळंबोली येथील FCI (Food Corporation Of India) येथील Area Manager अनिल चव्हाण यांच्याशी चर्चा करून, कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या प्रश्नांवर चर्चा केली. कळंबोली येथील मुंबई महानगर लोखंड व पोलाद बाजार समितीलाही त्यांनी भेट दिली. तेथील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. कळंबोली गांव येथील S.D.Bhagat शाळेत आयोजित केलेल्या बैठकीलाही पार्थ पवार उपस्थिती होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आमदार बाळाराम पाटील, कामगार नेते प्रकाश जाधव, पनवेल महानगरपालिकेचे विरोध पक्षनेते प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, सातारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, मुंबई महानगर लोखंड व पोलाद बाजार समिती सभापती गुलाबराव जगताप, व आजी माजी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
कळंबोली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीलाही पार्थ पवार यांनी हजेरी लावली. यावेळी मनसे रायगड जिल्ह अध्यक्ष अतुल भगत, जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण, तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ, मनसे शहराध्यक्ष अमोल बोचरे, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय काशीद व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.










