न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नागपूर (दि. ४ एप्रिल) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही लालची इंद्र असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले हे नागपूर मधून कॉंग्रेसचे आगामी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत.
नागपूर मध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे लालची इंद्र असल्याचे नाना पटोले यांनी म्हंटले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय नेत्यांकडून एकमेकांवर सडकून टिका केली जात आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना राजकारणाची पातळी खूपच खालावल्याचे चित्र यंदाच्या निवडणुकीत दिसत आहे. इंद्रदेव हे फार लालची होते, असे सांगत नरेंद्र आणि देवेंद्र हे दोघेही लालची असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. इंद्रदेवाला कोणतीही अडचण असल्यास ते वरच्या देवांना भेटायचे, याप्रमाणेच आता मोठे देव तुम्ही आहात त्यामुळे या दोघांना वाचवायचे की पाडायचे हे तुम्ही ठरवायचे, असे ते पुढे म्हणाले.










