न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल) :- चिंचवडगावातील श्री गजानन सत्संग मंडळाच्या वतीने जिल्हा सैनिक वेलफेअर फंडास एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे यांनी सैनिक वेलफेअर ऑफिसर मेजर मिलिंद तुंगार यांच्याकडे मदतीचा हा धनादेश सुपुर्द केला.
मंडळाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास यावेळी मंडळाचे सचिव प्रताप भगत, उपाध्यक्ष किशोर कदम, खजिनदार विष्णू पूर्णये, सहकार्यवाहक श्रीपाद जोशी, सह खजिनदार दत्तात्रय सावकार, सल्लागार रमाकांत सातपुते, श्रीकांत अणावकर, सभासद बाळकुष्ण मराठे, देविदास कुलथे आदींसह भक्तगण व सेवेकरी उपस्थित होते.










