न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने १४, १७, १९ वयोगटातील मुलींच्या जिल्हास्तर शालेय योगासन स्पर्धेचे कासारवाडी जलतरण तलावाजवळील हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा योगा संघटनेचे अध्यक्ष मनोज काळे व सचिव रमेश मांडवकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी क्रीडाधिकारी अनिता केदारी, क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवे, कार्याध्यक्ष विवेक साबळे, शरद लावंड, रामेश्वर पवार आदी उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन चौधरी एस आर, साळी वैशाली , पुनाजी पारधी यांनी केले.
पंचप्रमुख सिद्धार्थ शिदे, दिपक जैसवाल, मोहसीन शेख यांनी काम पाहिळे. स्पर्धेसाठी १३९ शाळांमधून ५५० विद्यार्थीनीनी सभ्गा घेतला. उद्याही वयोगटातील मुलांच्या स्पर्धा नियोजीत वेळाप्रमाणे होतील.












