न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री आत्मनिर्भर पथविक्रेता स्वनिधी योजनेची अंमलबजावणी प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी (फेरीवाल्यांनी) स्टेट बैंक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनिअन बैंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बैंक, बैंक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बैंक, एच.डी.एफ.सी. बँक ऍक्सीस बँक, आय. सी. आय. सी. बँक या बँकेच्या शाखेत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत, त्यांच्यासाठी (दि. ३०) रोजी लाभार्थीचे कर्ज मंजूरीकामी संबंधित बँकेमार्फत विशेष कॅम्पचे आयोजन केलेले आहे.
त्याचा लाभ सर्व संबंधित लाभार्थी यांनी घ्यावा व याकामी संबंधितांनी अर्ज सादर केलेल्या बँक शाखेत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून कर्ज मंजूरीची कार्यवाही करून घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केलेले आहे.












