- तिघांकडून फिर्यादीला दगडाने मारहाण; डोक्याला टाके अनं सूज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- चाकण येथिल मुटकेवाडी चौकात पुणे-नाशिक हायवेच्या बाजुला असलेल्या गणराज आईस्क्रिम या दुकानावर फिर्यादी होते. त्यावेळी फिर्यादीच्या दुकानावर आलेले देशपांडे नावाचे इसम यांना आरोपी मारहाण करत होते. त्यांची भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी हे गेले. त्यावेळी आरोपी क्र. १ व २ यांनी त्यांना शिवीगाळ केली.
तसेच सह आरोपी क्र. ३ याने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारुन त्यांना जखमी केले. तसेच फिर्यादीच्या दुकानाची तसेच देशपांडे यांच्या दुचाकीचे आरोपींनी नुकसान केले आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला ७ टाके पडले व डोक्याला सूज आली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाणीची ही घटना (दि. २९) रोजी ९.४५ वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी संदीप शिवाजी गोसावी (वय ४२ वर्षे धंदा- व्यवसाय रा. मेदनकरवाडी, गोसावी वस्ती, चाकण) यांनी आरोपी १) विजय शिवाजी गोसावी, २) महिला आरोपी, ३) ऋषिकेश विजय गोसावी (सर्व रा. मेदनकरवाडी, गोसावीवस्ती, चाकण) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चाकण पोलीस ठाण्यात ६९० / २०२३भा.दं.वि कलम ३२४,४२७,५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटकेत आहेत. पोना १९२२ बिराजदार पुढील तपास करीत आहेत.