- वॉचमनसह तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- आप-आपसात संगनमत करुन हिंजवडी फेज २ येथे काम सुरु असणाऱ्या मेट्रोच्या बांधकाम साईटवरून आरोपींनी लोखंडी रॉडची चोरी केली.
हा ऐवज त्यांच्या टीव्हीएस व्हिक्टर (एम.एच १४/ए.पी.६९७८) मध्ये चोरुन घेवुन जात असताना (दि. ३०) रोजी रात्री ००.३० च्या सुमारास फिर्यादीच्या निदर्शनास आला. तब्बल नऊ हजार रुपयांचा माल जप्त केला.
फिर्यादी दत्ता हिंम्मत राठोड (वय २५ वर्ष, धंदा नोकरी, रा. भोईरवाडी, फेज ३, माण-हिंजवडी) यांनी आरोपी १) विकासराम पुदीन यादव (वय १९ वर्ष), २) विधीसंघर्षित बालक, ३) वॉचमन चंद्रशेखर धर्मराज केंद्रे (रा. माणगाव), ४) प्रशांत पांडे (रा. फेज ३ माणगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यात १०३१/२०२३ भा.द.वि. कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल असून आरोपी क्र १, ३ व ४ अटक आहेत. पोउपनि खारगे पुढील तपास करीत आहेत.







![[हिंजवडी] :- मेट्रोच्या बांधकाम साईटवरून लोखंडी रॉडची चोरी करताना रंगेहाथ पकडले..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/08/download-4-14-90x60.jpeg)
![[हिंजवडी] :- मेट्रोच्या बांधकाम साईटवरून लोखंडी रॉडची चोरी करताना रंगेहाथ पकडले..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/08/maxresdefault-1-90x60.jpg)



