न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी २ एप्रिल पासून सुरू झाला असला, तरी सुरुवातीचे दोन दिवस एकाही इच्छुकाने अर्ज भरला नव्हता. गुरुवारी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरुन मावळचे खाते उघडले आहे.
२ एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिध्द झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशीपासूनच इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक आपल्या उमेदवारांसाठी अर्ज विकत घेऊन जात आहेत.
गुरुवारी दि. ४ रोजी नवनाथ विश्वनाथ दुधाळ यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. ते मावळसाठी उमदेवारी अर्ज भरणारे पहिले उमेदवार ठरले आहेत. गुढीपाडव्यानंतरच शुभ महुर्तावर उमेदवार अर्ज भरतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.










