न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ एप्रील) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक व माजी क्रीडा समिती सभापती व शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांची ”युवासेना पुणे जिल्हा समन्वयक” पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व नितीन सरदेसाई यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
कार्यक्षम नगरसेवक म्हणून ननावरे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत काम केले आहे. राजकारणात ते सक्रियपणे काम करीत आहेत. पक्ष बांधणीसाठी व शिवसेनेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जितेंद्र ननावरे यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी पक्षाने सोपविली आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातल्या घटकांपर्यंत शिवसेना युवासेनेचे विचार नागरिकांपर्यत पोहोचविणार आहे, अशी ग्वाही ननावरे यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना दिली.










