न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ एप्रिल) :- शिवसेना-भाजप -रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज शनिवार (दि. ६) रोजी पिंपरी-चिंचवड भाजप कार्यालयास भेट दिली. निमित्त होते भारतीय जनता पक्षाच्या ३९ व्या वर्धापन दिनाचे. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
भाजप कार्यालयात गुढीचे पूजन केले. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भाजपचे सरचिटणीस प्रमोद निसळ, भाजपचे स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, रामकृष्ण राणे, नंदू भोगले, संजय परळीकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.










