न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ एप्रिल) :- भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत आज शनिवार (दि. ६) रोजी पिंपरी येथील पक्ष कार्यालयात अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अमित गोरखे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, उमा खापरे, महापौर राहुल जाधव, सभापती विलास मडेगिरी, राजेश पिल्ले, अमोल थोरात, नगरसेवक माऊली थोरात, केशव घोळवे, मोरेश्वर शेडगे, बोबडेताई व इतर जेष्ठ भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.










