न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल) :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना उपनेत्या आमदार निलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन व शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या सुचनेनुसार व प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर यांच्या अनुमोदनाने शिवशाही व्यापारीसंघ दिव्यांग आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी कलावंत आण्णा गजानन सोनेवार यांच्या निवडीची घोषणा प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली.
दिव्यांग आघाडीचे प्रमुख कलावंत सोनेवार यांनी दिव्यांग बांधवांच्या सोबत विधवा-माता-भगीनीची सेवा अखंडपणे करीत राहवे, अशी अपेक्षा व्यक्त करून, शिवशाही व्यापारीसंघास दिव्यांग आघाडीकडुन जनतेची सेवा करण्यासाठी प्रचंड शक्ती मिळो यासाठी साकड घालण्यात आले.
यावेळी प्रदेश खजिनदार नवनाथ माऊली जाधव, मारूती म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, रमेश दाखले, रविकिरण घटकार, निलेश भोरे, आशिष वाळके, गणेश पाडुळे, रोहीत विभुत्ते, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विशाल बाविस्कर, संदिप खुंटे, सागर शिंदे, भरत इंगळे, दिपक कांबळे, नितीन येडके आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.










