न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारानिमित्त अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली.
भक्ती शक्ती चौकातील शिवाजी महाराज-संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाला अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागीय झाले होते. ‘एकच वादा अजित दादा’, ’पार्थ पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी आदी उपस्थित होते.










