न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल) :- यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) व पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये मंगळवार (दि. ९) वेळ सकाळी १०:३० वाजता ‘मतदार जनजागृती अभियानाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात स्वीप (सिस्टेमॅटिक व्होटर एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टीसिपेशन प्रोग्राम) अंतर्गत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. मतदाराचे हक्क, कर्तव्य व जाणीव जागृतीचे कार्य या मतदार जनजागृती अभियानाद्वारे होणार आहे.
या कार्यक्रमात सर्वजण मतदानाचा हक्क बजावण्याबद्दल सामुहिक शपथ घेतील. तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहेत. या कार्यक्रमात ‘यशस्वी’ संस्थेचे सर्व विद्यार्थी, अध्यापक, कर्मचारी तसेच अन्य सामान्य नागरिकही सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांनी दिली.










