न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२३) :- रावेत नदी जल उपसा केंद्र येथे विद्युत पुरवठा करणारे रहाटणी व चिंचवड दोन्ही फिडर फॉल्टी असल्याने वीजपुरवठा खंडित झालेला आहे.
त्यामुळे शहरात आज शनिवारी सायंकाळी होणारा पाणी पुरवठा अनियमित, कमी दाबाने आणि विस्कळीतपणे होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
चिंचवड फिडरचा कंडक्टर तुटलेला आहे व राहणी फीडर ट्रीप होत आहे. महावितरणकडून दोष निवारणाचे काम चालू आहे. विद्युत पुरवठा पूर्ववत होण्यास वेळ लागू शकतो. दोष निवारण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरु होईल.