न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ८ एप्रिल) :- चिखली येथे भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून ७ ते ८ भंगाराची गोदामे जळून खाक झाली आहेत. विशेष म्हणजे हे सर्व विनापरवाना चालत होते, अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी किरण गावडे यांनी दिली आहे.
महापौर राहुल जाधव यांनी घटनेसंबंधी माहिती दिली, तोपर्यंत अग्निशमन दलाला याची कल्पना नव्हती. पिंपरी-चिंचवडमध्ये ७ ते ८ भंगार गोदामांना भीषण आग लागली. चिखली परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगाराची दुकानं, गोदामं, असून मोठ्या प्रमाणावर आग लागल्याच्या घटना घडतात.
सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास महापौर राहुल जाधव यांनी चिखली परिसरात आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन अग्निशमनच्या नाल १२ ते १५ वाहनांनी आग आटोक्यात आणली. यामध्ये पिंपरी, प्राधिकरण, भोसरी, तळवडे, चिखलीसह अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या सहभागी झाल्या होत्या.










