न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल) :- पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान शाहूनगर-संभाजीनगर-इंदीरानगर-रामनगर-दत्तनगर-शंकरनगर-विद्यानगर-मोहननगर-चिंचवडस्टेशन-लालटोरीनगर-मोरवाडी-म्हाडा व इतर (पिंपरी विधानसभा) या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, मावळचे उमेदार पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत बाईक रॅली काढण्यात आली.
या बाईक रॅली दरम्यान नागरीकांकडून अजितदादांचे व मावळ लोकसभेचे तरूणांचे लाडके उमेदवार पार्थ पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी नागरीकांनी फटाके वाजवून व फुलपुष्प देवून पार्थचे स्वागत केले व मनापासून शुभेच्छा दिल्या.
या रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोगभाऊ वाघेरे व युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या मार्गदर्शनांखाली माजी आमदार आण्णा बनसोडे, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका मंगला कदम, वैशाली काळभोर, नारायण बहीरवाडे, उपाध्यक्ष अमित बच्छाव, दिलीप दातीर पाटील, राजू मिसाळ, जगदीश शेट्टी, प्रसाद शेट्टी, वर्षा जगताप व सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या रॅलीत जवळपास सर्व ज्येष्ठ व युवक मित्र परीवार, कार्यकर्ते सुमारे २०० ते २५० मोठ्या संख्येने बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅलीमध्ये ढोल लेझीम, डिजे म्युझीक सिस्टीममुळे संपूर्ण परीसर राष्ट्रवादीमय झाला होता.
“एकच वादा अजित दादा, खासदार युवा पार्थ दादा हवा” कार्यकर्त्यांच्या व मित्र परीवारांच्या घोषणांनी रॅलीमध्ये चैतन्यपूर्णक व आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. सर्व युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकून विजय आमचाच आहे. हे आधीच जाहीर केले. नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहता पार्थ पवार निश्चितच लाखोंच्या संख्येने निवडूण येतील, असा आशावाद व्यक्त केला.










