न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल) :- महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज मंगळवार (दि. ९) रोजी मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, आमदार बाळा भेगडे, अमित गोरखे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले की, केवळ घराण्यातील माणूस पुढे करुन राष्ट्रवादी या निवडणुकीला सामोरे जात आहे. या अगोदर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यांच्या उमेदवाराचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कधीही रस्त्यावर उतरले नव्हते. कार्यकर्त्यांना मदत करत नव्हते”.
“ही निवडणूक देशाहिताची आहे. मतदारसंघात जाणकर मतदार आहे. देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा अचूक निर्णय जाणकार मतदार घेतील. ४० डिग्री तापमानात पवार कुटुंबीय भर उन्हामध्ये आज फिरताना पाहत आहात. याचाच अर्थ त्यांचा पराभव निश्चित आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना मतदारसंघापर्यंत आणण्याचे काम केले आहे. केलेली विकासकामांच्या बळावर मी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मी निवडून येणारच, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला










